‘सामना’ मुखपत्रातून शरद पवार यांच्यावर टीका

मंगळवार, 17 सप्टेंबर 2019 (15:42 IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना आणि भाजप पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे स्वत: शरद पवार यांनी राज्यभर दौरा करुन कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीका केली. पक्ष सोडून जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत. त्यांच्या याच वक्तव्यावर शिवसेनेने शरद पवार यांना प्रश्न विचारले आहेत. ‘स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो शिवसेनेने आपल्या ‘सामना’ मुखपत्रातून शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. 
 
‘पवार साहेबांनी स्वाभिमानाच्या मुद्द्यावर सोनियांबरोबर वाद केला. आज त्याच सोनियांबरोबर मागील दीड-दोन दशकांपासून त्यांचे राजकीय गुप्तगू सुरु आहे. पवारसाहेब, तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत असाल ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबूच भुईसपाट झाला. स्वाभिमानाचे नाव का घेता? वळणाचे पाणी वळणाला गेले’, असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे.वारसाहेब?’, असा प्रश्न शिवसेनेने आपल्या ‘सामना’ मुखपत्रातून शरद पवार यांना विचारला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती