भाजपकडून व्यंगचित्र मालिकेतून शरद पवार यांच्यावर टीका

शनिवार, 28 सप्टेंबर 2019 (16:15 IST)
भाजपा महाराष्ट्राने ‘रम्याचे डोस’ या व्यंगचित्र मालिकेतून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “शिकवण कोणाची” या शिर्षकाखाली महाराष्ट्र भाजपाने पवरांवर बोचरी टीका केली. दोन मुलांमध्ये संवाद दाखवत पवारांवर निशाणा साधला आहे. पहिला मुलगा म्हणतो, “दिल्लीसमोर झुकणार नाही” म्हणतायत, साहेब.

शिवाय महाराजांच्या शिकवणीचे दाखले पण देतायत. त्यावर दुसरा मुलगा म्हणतो, “१९७८ ला पाठीत खंजीर, १९८७ ला दिल्लीची मनसबदारी आणि १९९९ला आधी फोडाफोडी आणि नंतर सत्तेसाठी इटलीचे मांडलिक या सगळ्यांत महाराजांची शिकवण मला तर दिसत नाहीये. ही औरंगजेबाची शिकवण तर नाही ना..?”
 
इटलीच्या मांडलिकांना दिल्लीचे वावडे!!
रम्या विचारतोय ही शिकवण कोणाची?

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती