भिडे हे विद्वान आहेत- प्रकाश आंबेडकर

मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019 (10:44 IST)
शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे विद्वान असून, त्यांच्याबाबत मी कोणतेच भाष्य करणार नाही असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. 
 
मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये केलेल्या भाषणात भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला असे वक्तव्य केले, ज्याबद्बादल संभाजी भिडे यांनी जगासाठी बुद्ध उपयोगाचा नाही तर संभाजी महाराज महत्त्वाचे आहेत असे वादग्रस्त वक्तव्य केले.  भिडे यांच्या याच वादग्रस्त वक्तव्याबाबत जेव्हा प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी मी याबाबत काहीही भाष्य करणार नाही कारण संभाजी भिडे विद्वान आहेत अशी खोचक  प्रतिक्रिया दिली आहे. 
 
सोबतच त्यांच्न्या पक्षातून बाहेर पडत भाजपात जाणारे  गोपीचंद पडळकर यांच्या भाजपा प्रवेशाबाबत त्यांना विचारले तेव्पहा आंबेडकर म्डहणाले की पडळकर निवडणूक झाल्यावर पुन्हा वंचित बहुजन आघाडीत येतील. सोबत मी  पडळकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत असे म्हणाले. एमआयएमसोबत युती तुटल्याने वंचित बहुजन आघाडी 288 जागांवर लढणार आहे त्यांनी संगितले असून वरळी मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या आदित्य ठाकरेंनाही शुभेच्छा दिल्या आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती