‘ती’ आमदारांची यादी नसल्याने राज्यपाल तातडीने मंजूर करतील,असा विश्वास : रोहित पवार

मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (08:09 IST)
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याच्या नियुक्त्यांबाबत ३१ जुलैपर्यंत निर्णय घेतला जाईल,असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं,पण आता मुदत उलटून गेली आहे. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक होत आहेत.विद्यार्थी सोशल मीडियावर अजित पवार यांना याबाबत प्रश्न विचारत आहेत.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी देखील अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
 
दरम्यान,आमदार रोहित पवारांनी एका विद्यार्थ्याचे ट्विट रिट्विट करत अजित पवार हे शब्द पाळणारे नेते असल्याचे म्हटले आहे.रोहित पवार म्हणाले,“अजित पवार हे शब्द पाळणारे नेते आहेत. एमपीएससी सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने ३१ जुलै पूर्वीच राज्यपाल महोदयांकडं सदस्यांची यादी पाठवलीय.ती विधान परिषदेच्या आमदारांची यादी नसल्याने महामहीम राज्यपाल महोदय तातडीने मंजूर करतील, असा विश्वास आहे.”

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती