मराठा समाजाला आरक्षण शिर्डीत विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

बुधवार, 25 जुलै 2018 (09:09 IST)
मराठवाड्यातील कृष्णा गंभीरे या २४ वर्षांच्या तरुणाने मंगळवारी उशिराने मराठा समाजाला आरक्षण देण्यास राज्य सरकार चालढकल करीत असल्याच्या निषेधार्थ शिर्डीत विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीरे यांना तातडीने साई संस्थानच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे पुढचा होणार अनर्थ टळला आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील कृष्णा गंभीरे रहिवासी आहेत. मुख्यमंत्री  मराठा समाजाला आरक्षण देण्यास चालढकल करीत असल्याचा निषेध करत त्यांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. साई संस्थानच्या रूग्णालयात  त्यांना दाखल करण्यात आले होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विषप्राशन करणाऱ्या कृष्णा गंभीरे या तरूणाचे काही बरे वाईट झाल्यास त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची राहील असा इशारा शिर्डीतील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सचिन चौगुले यांनी दिला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती