सासऱ्याने केला मुलीसारख्या सुनेवर घरात, कारमध्ये बलात्कार

गुरूवार, 31 ऑक्टोबर 2019 (09:17 IST)
नात्याला  काळिमा फासणारी घटना नाशिक मध्ये घडली आहे. सास-याने सुनेवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची सुनेने कुठेही वाच्यता करु नये म्हणून सासूने तिच्या हाताची नस  देखील  कापल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात बलात्कारासह कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. या घरातील सर्व उच्च शिक्षित असून राजकारण, समाजकारणा सोबत निघाडीत असलेला परिवार आहे. 
अशोक हरिश्चंद्र  (५१, रा. आनंदवली, गंगापूररोड), आकाश हरिश्चंद्र  (पती) आणि पीडित महिलेची सासू प्रमिला  अशी या घटनेतील संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कारासह कौटुंबिक हिंसाचार कायदा, मारहाण तसेच धमकाविण्याचा गुन्हा दाखल केला असून, अशोक जाधव या नराधम सासऱ्यांला पोलिसांनी  अटक करण्यात आली आहे. पीडित महिला फिर्यादीच्या तक्रारीनुसार, १ फेब्रुवारी २०१९ ते १८ मार्च २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला.  सासरा अशोक जाधव याने राहत्या घरात तसेच चांडक सर्कलजवळील निर्जन ठिकाणी एमएच १५ डीएल  या इनोव्हा कारमध्ये सुनेवर बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केल्यास मुलाबरोबर नांदू देणार नाही, अशी धमकी त्याने सुनेला दिली.

पीडित महिलेने हिंमत करून आपल्यावर अन्याय झाल्याची तक्रार पतीसह तिच्या सासूकडे केली. मात्र, या दोघांनी बलात्काराच्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत तिला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. सोबतच सासूने ही घटना बाहेर कळू नये म्हणून सुनेच्या हाताची नस देखील कापली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासऱ्याने कारमध्ये एका निर्जनस्थळी घेऊन जात सुनेवर बलात्कार केला. पोलिसांनी तिघा संशयित आरोपींपैकी मुख्य संशयित अशोक जाधवला अटक केली आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे. तर सासऱ्यासह पती आणि सासू संशयित आरोपी असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर आता पोलीस संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करत आहेत. तर पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.तिघांकडून वारंवार होणारी मारहाण आणि त्रास असहाय्य झाल्याने या महिलेने गंगापूर पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अचंल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एन. पवार करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती