राज यांच्याकडून व्यंगचित्रातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018 (12:10 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपल्या खास शैलीतून निशाणा साधला आहे. नरक चतुर्दशी दिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. याचाच संदर्भ घेत चित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभ्यंगस्नानाच्या परंपरेप्रमाणे आंघोळीच्या आधी अंगाला तेल लावून घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. याचदरम्यान,एक जण येऊन त्यांच्या कानामध्ये बोलतो की, साहेब... अख्खा महाराष्ट्र तुम्हाला 'धुवायला' आलाय, पाठवू का?. तर दुसरीकडे, चित्रात मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर लोकांची तोबा गर्दी जमलेली दाखवण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती