आता भाजपाला २०० जागाही मिळणार नाही : राज ठाकरे

मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 (09:19 IST)
याआधी २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा विचार केला तर भाजपाला गुजरातमध्ये १६५ जागा मिळणे अपेक्षित होते. परंतु नरेंद्र मोदींसह अख्खा भाजपा या निवडणुकीत विजयासाठी लढूनही त्यांचा तसा पराभवच झाला, दुसरीकडे एकटे राहुल गांधी कॉँग्रेससाठी लढत होते. या सर्व गोष्टींचा विचार करता, आज लोकसभेची निवडणूक झाली तर भाजपाच्या ७० ते ८० जागा कमी होतील. येणाºया निवडणुकीत भाजपाला २०० जागाही मिळणार नाही असे भाकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
 
इंद्रकुमार गुजराल, देवेगौडा, चंद्रशेखर हे पंतप्रधान कधी झाले असते काय? महात्मा गांधी यांनी नेहरूंचे पंतप्रधानपदासाठी नाव पुढे केले म्हणून ते झाले, त्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी पंतप्रधान झाले, तेव्हा कोणीच आजन्म कोणत्याच पदासाठी कायम नसतो. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपोआपच पंतप्रधानपदाचा उमेदवार समोर येतो. आपल्या लोकशाहीत अगोदर खासदार निवडून यावा लागतो व नंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरतो हे लक्षात घेतले पाहिजे. असे राज ठाकरे यांनी  सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती