राज ठाकरे म्हणाले ‘दीदी मी खरंच तुमचा ऋणी’

शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (16:53 IST)
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीपणाची ओळख ठसवण्यासाठी मराठी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले आहे. या आवाहनाला भारताच्या गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर अर्थात लता दीदी यांनी देखील सहभाग घेतला आहे. त्यांनी आपली मराठी स्वाक्षरी करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवली आहे. यावर राज ठाकरे यांनी ‘दीदी मी खरंच तुमचा ऋणी’, असल्याचे म्हटले आहे.
 
मराठी भाषा दिनानिमित्त मनसेने मराठी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेमध्ये लता मंगेशकर यांनी देखील सहभाग घेत संत ज्ञानेश्वरांचे उषाताई मंगेशकर यांनी रेखाटलेले चित्र पाठवले. विशेष म्हणजे यावर लता मंगेशकर यांनी आपली स्वाक्षरी पाठवत मराठी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला. त्यामुळे राज ठाकरे यांनी आपण दीदींचे ऋणी असल्याचे म्हटले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती