इगतपुरी-अस्वली रेल्वे रुळ पुराच्या पाण्या खाली बुडल्याने वाहतूक ठप्प

गुरूवार, 26 सप्टेंबर 2019 (09:55 IST)
घोटी: इगतपुरी तालुक्यात परतीच्या पावसाने दुसऱ्या दिवशीही धुव्वाधार बॅटिंग करीत नदिनाले पुन्हा एकदा तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. अस्वली रेल्वे स्थानकावरील रेल्वे लाईनचे रुळ पुराचे पाण्याखाली गेल्यामूळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. गोदावरी एक्सप्रेस घोटी स्थानकावर थांबविण्यात आली होती इतर सर्व गाड्या दोन तास उशिराने सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
 
भात शेतीला पोषक असलेला पाऊस टोमॅटो बागायती पिकांसाठी मारक ठरला आहे.काल मध्यरात्री दोन वाजे दरम्यान मुसळधार बरसलेल्या पावसामुळे भात शेती तुडुंब पाण्याखाली गेली होती. मात्र रात्रीपासून वीज पुरवठा खंडित असून चोवीस तास उलटूनही वीज पुरवठा सुरळीत झाला नसल्याने आजही झालेल्या जोरदार पावसामुळे खंडीत वीज पुरवठा पूर्ववत होईल याची शास्वती नाही.
 
सकाळी काहीशा उघडलेल्या पावसाने आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाली होती दुपारी साडे चार वाजेपासून विजेच्या कडकडाटासह दोन तास झालेल्या धुव्वाधार पावसामुळे नदिनाले ओसंडून वाहू लागले असून शेतीचे बांध फुटले तर टोमॅटो सारख्या बागायती पिकांमध्ये पाणी साचून पिके नष्ट झाली असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच अस्वली स्टेशन लगत असलेल्या वस्तीतील साहेबराव धोंगडे यांचे घरात पाणी शिरले आहे. भुसावळ-मुंबई मध्य रेल्वेच्या अस्वली रेल्वे स्थानकावर रेल्वे लाईनच्या रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. गोदावरी एक्स्प्रेस घोटी रेल्वे स्थानकावर तासभर थांबवण्यात आली आहे. इगतपुरी नाशिक दरम्यान तपोवन (अस्वली) गोदावरी ( घोटी) , नागपूर सेवाग्राम (इगतपुरी), राजधानी (इगतपुरी), शटल (इगतपुरी) थांबवण्यात आले आहे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती