मराठा समाजाच्या बैठकीत राडा; परिसरात तणावाची स्थिती! नेमकं काय झालं?

रविवार, 31 मार्च 2024 (10:15 IST)
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये मराठा समजाच्या समन्वयकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत राडा झाल्याचे समोर आले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे पैसे घेऊन काही लोक या बैठकीत आले होते, असा आरोप या बैठकीतील समन्वयकांनी केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीदरम्यान दोन गटांत हाणामारी झाली आहे. या बैठकीत बाहेरचे लोक आल्याचे म्हटले जात आहे. दोन गटांत ही मारामरी झाल्यांतर ही बैठक आता तात्पुरती थांबवण्यात आली आहे.
 
संभाजीनगरच्या बैठकीत नेमकं काय झालं?
संभाजीनगरमध्ये मराठा समाजाची समन्वय बैठक होती. संभाजीनगर लोकसभेतून मराठा समाजाचा एक उमेदवार देण्यासाठी बैठक आयोजित केली होती. जळगाव रोड वरील मराठा मंदिर सभागृहात ही बैठक नियोजित होती. या बैठकीसाठी मराठा बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. केवळ पुरुषच नव्हे तर महिला आंदोलकही एकमेकींना भिडल्या.  या बैठकीत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून काही लोक पैसे घेऊन आले, असा आरोप मराठा समन्वयकांनी केला.

Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती