पुणे लाचखोरीतही पुढे, राज्यात ठरले अव्वल

सोमवार, 18 जून 2018 (15:08 IST)
राज्यात पुणे लाचखोरीमध्येही अव्वल आहे. गेल्या सहा महिन्यांत पुणे शहर आणि जिल्ह्यात ३५ शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे, तर पुणे विभागातही सर्वांत जास्त ८८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी २०१८ पासून ते ७ जून २०१८ या काळात राज्यभरात  ३९२ सापळे रचून ५४२ जणांना रंगेहाथ पकडले. गेल्या वर्षीपेक्षा यंदा कारवाईमध्ये वाढ झाली आहे. २०१७ मध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यांमध्ये ३७० सापळ्यांमध्ये ४९६ जणांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले हाते. यंदाच्या वर्षी सर्वांत जास्त कारवाई पुणे विभागात झाली आहे. यामध्ये ८८ सापळे रचून लाच घेणाऱ्यांना पकडण्यात यश आले आहे. यातील पुणे जिल्ह्यात ३५, सोलापूर १९, कोल्हापूर १३, सातारा १२ आणि सांगलीतील १० सापळ्यांचा समावेश आहे. शासकीय अधिकारीही बदलीच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील ‘क्रिम पोस्टिंग’ मिळविण्याचा खटाटोप करतात. त्यामुळेच पुणे विभागातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईही इतर विभागांमध्ये सरस आहे. त्याखालोखाल नागपूर विभागात ५८ सापळे रचण्यात आले.


विभागनिहाय कारवाईवाई

विभाग               सापळे
पुणे                   ८८
नागपूर              ५८
अमरावती          ५४
संभाजीनगर      ४७
ठाणे                  ४५
नांदेड                ४१
नाशिक             ३८
मुंबई                २१
एकूण             ३९२

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती