खासदारांचे वेतन घ्या, मात्र खासदार निधीत कपात करु नका, नवनीत राणा यांची मागणी

बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (08:35 IST)
खासदारांचे वेतन घ्या, मात्र खासदार निधीत कपात करु नका अशी विनंती अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांनी केली. पावसाळी अधिवेशनानिमित्त दिल्लीत आलेल्या नवनीत राणा यांनी लोकसभेत ही मागणी केली आहे.लोकसभेने संसदेच्या सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन दुरुरस्ती विधेयक मंजूर केले. यावर चर्चे दरम्यान नवनीत राणा यांनी ही मागणी केली आहे. दरम्यान पुढील वर्षभरासाठी खासदारांच्या वेतनामध्ये ३० टक्के कपात करण्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
 
दरम्यान खासदार नवनीत राणा कौर यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यासह त्यांचे पती आणि आमदार रवी राणा, दोन्ही मुलं, सासू, सासरे अशा एकूण १२ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. नवनीत राणा यांच्यावर सुरुवातीला घरी उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यानंतर त्या कोरोनामुक्त झाल्या. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती