पानसरे हत्या : संशयितांना पकडण्यासाठी १० लाखाचे बक्षीस

बुधवार, 31 जानेवारी 2018 (09:40 IST)

ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सारंग दिलीप अकोलकर आणि विनय बाबूराव पवार यांना पकडून देणाऱ्यांना १० लाख रुपयांचे बक्षीस बुधवारी येथे जाहीर करण्यात आले.

संशयित आरोपी अकोलकर हा पुण्याचा असून, पवार हा कराडजवळील उंब्रजचा रहिवासी आहे. यापूर्वी पानसरे हत्येप्रकरणी समीर गायकवाड आणि सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे यांना अटक झाली होती. तपासामध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे पवार व अकोलकर यांची नावे पुढे आली. परंतु त्यांचा शोध लावण्यात पोलिसांना अद्याप यश आले नव्हते. त्यामुळे सरकारने बुधवारी त्यांची माहिती देणाऱ्यास हे १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.पानसरे यांच्यावर फेब्रुवारी २०१५ मध्ये हल्ला झाला होता. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती