वारकर्‍यांना चांगल्या सुविधा द्या

शनिवार, 7 जुलै 2018 (12:21 IST)
आषाढी यात्रेत येणार्‍या भाविकांना पिण्याच्या पाण्याबरोबरच आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्या, अशी सूचना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती शिवानंद पाटील यांनी दिल्या.
 
शुक्रवारी, जि.प.च आरोग्य समितीची बैठक जेऊर (ता. कराळा) येथे झाली. आमदार नारायण पाटील यच्यासह आरोग्य समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. पंढरपूरच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठीचे नियोजन केले आहे. यात कुचराई करता कामा नये. अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आपले नेमून दिलेले काम व्यवस्थितपणे पार पाडावे, असेही पाटील यांनी सांगितले.
 
अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर असल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तडवळ (ता.अक्कलकोट) येथे लवकरात लवकर स्थलांतर करावे अशी सूचना पाटील यांनी दिली.
 
गुरूपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थची पालखी वळसंग ते अक्कलकोट या मार्गे दुधनी येथे जात असल्याने या ठिकाणी सर्व भाविकांना वैद्यकीय सुविधा द्या, असे त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती