राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे शिवसेनेत, वाचा काय आहे सत्य

बुधवार, 21 ऑगस्ट 2019 (16:25 IST)
विधानसभा निवडणुका जश्या जवळ येत आहेत तसे अनेक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून भाजपा व शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यातही आता राष्ट्रवादीला मोठे धक्के बसले आहेत. त्यात राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे शिवसेनेत जाणार अशी जोरदार चर्चा आहे. मात्र एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तटकरे यांनी वृत्ताचे खंडन केले आहे.
 
तटकरे म्हणतात की, “मी सुनील तटकरे दिल्लीत असून, मजबुतीने, विचाराने, सिद्धांताने पवार साहेबांसोबत आहे. अफवा पसरवणाऱ्या बिकाऊ पत्रकारांवर कायदेशीर कारवाई करता येईल का याची चाचपणी करणार आहे अशी संतप्त प्रतिक्रिया यांनी दिली आहे.
 
सुनील तटकरे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची तसेच उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा सुरु असल्याचं वृत्त सध्या राज्यात आहे. त्याबाबत तटकरेंना विचारलं असता, त्यांनी या बातम्यांवरुन संताप व्यक्त केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती