मोदींना राष्टपिता म्हटल्याने मिसेस सीएम झाल्या टीकेच्या धनी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा वादात अडकल्या, अमृता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना, त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड  टीका होत आहे. आपला देश राष्ट्रपिता म्हणून फक्त आणि एकाच  व्यक्तीला मानतो तो म्हणजे महात्मा गांधी होय. पण अमृता फडणवीस यांनी थेट मोदींचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करताना, “आपल्या देशाचे पिता नरेंद्र मोदीजी, जे समाजाच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेण्याची प्रेरणा देतात त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा”. असं म्हटलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली आहे. अमृता फडणवीस यांनी ओ रे मनवा तू तो बावरा है, हे स्वत:च्या आवाजात गायलेलं गाणं ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाळ्या वाजवताना दिसतात. या आगोदर अमृता यांनी सुरक्षा झुगारून प्रसिद्ध क्रूझ आंग्रीया जहाजच्या शेवटच्या टोकावर जाऊन सेल्फी काढला होता तेव्हा त्यांनच्यावर टीका झाली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती