फॅक्ट चेक : सैराट फेम नागराज मंजुळे राजकारणात, वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

सोमवार, 8 एप्रिल 2019 (08:21 IST)
सोशल मीडिया सध्या अनेक बाबतीत गाजत आहे. सेलेब्रिटी, व्हिडियो, राजकारण आणि इतर अनेक गोष्टी यावर मेसेज आणि इमेज स्वरूपात फिरत असतात. यामध्ये अनेकदा खोटी माहिती पुरवली जाते आणि त्यामुळे अनेक गैरसमज निर्माण होतात. सोशल मीडियातून अनेक पद्धतीने प्रचार-अपप्रचार सुरु आहे. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. त्या प्रकारचे मेसेज जोरदार फिरत असून एक इमेज फाईल देखील फिरत आहे. नागराज मंजुळेंनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला, असं नेटकऱ्यांनी जाहीर करुन टाकलं. पण हे खरंच घडलं आहे का, कधी झाले त्यांनी खरच राजकारणात प्रवेश केला आहे का ? याचा विचारसुद्धा केला नाही आणि मेसेज जोरदार फॉरवर्ड केला आहे. मात्र या व्हायरल मेसेजनंतर वंचित बहुजन आघाडीने पूर्ण स्पष्टीकरण दिलं आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी वंचित बहुजन आघाडीत कोणताही प्रवेश केलेला नाही, असं वंचित बहुजन आघाडीचे  प्रवक्ते  सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागराज अजूनतरी राजकारण या पासून दूरू असून त्याने कोणतही प्रवेश केला नाही. मेसेज फॉरवर्ड करतांना काळजी घेणे फार गरजेची असून जर चुकीचा मेसेज समाजात गेला तर तर अफवा पसरून त्याचे वाईट परिणाम अनेकदा दिसून आले आहेत. त्यामुळे तुमच्याकडे मेसेज आला तर त्याची सत्यता नक्की तपासून पहा .

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती