तिची प्रकृती स्थिर पण चिंताजनक

शनिवार, 8 फेब्रुवारी 2020 (10:23 IST)
हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची प्रकृती स्थीर पण चिंताजनक असल्याचं नागपूरमध्ये तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. तिचं बर्न ड्रेसिंग करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिनमध्ये दिली. तिच्या नाकातून पोटात ट्यूब टाकण्यात डॉक्टरांना यश आले. त्यामुळे तिला ट्यूबद्वारे जेवण दिले जाणार आहे. 
 
तिचे हार्टरेट वाढले होते. मात्र औषधांनंतर त्यात थोडी सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तिचं ब्लडप्रेशर कमी जास्त होत असून, बर्न केसेसमध्ये ही बाब चिंताजनक असल्याचं डॉक्टर म्हणाले. मात्र तिच्यातले ऑक्सिजनचे प्रमाण चांगलं असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती