तो अश्लील व्हिडिओ पाठवत होता, मुंबई पोलिसांनी भारत-पाक सीमेजवळून अटक केली

वडाळा येथील एका महिलेला एका अनोळखी नंबरहून अश्लील व्हॉट्सअॅप मेसेज येत होते. त्या नंबरहून निरंतर अश्लील व्हिडिओ येणे सुरू राहिले तेव्हा महिलेने पतीकडे तक्रार केली.
 
पतीने अश्लील मेसेज करणार्‍याला थेट जाब विचारल्यावर तो म्हणाला मला असे व्हिडिओ पाठवायचे होते मी पाठवले आता जे करायचं असेल ते करा...यावर पतीने 5 जानेवारी रोजी वडाळा पोलिस स्टेशनात तक्रार दाखल केली. 
 
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान आरोपीने फोन आणि सिम कार्ड बदलल्यामुळे त्याला ट्रेस करायला अडचण येत असताना अखेर पोलिसांना यश मिळाले आणि  17 मे रोजी तो जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमधील बाफ्लियाज गावात असल्याचं कळाले. मेहफूज मोहम्मद राशिद खान असं त्याचं नाव असून मुंबई पोलिसांनी थेट भारत-पाक सीमेजवळून त्याला अटक केली.
 
पुंछ सेक्टर संवदेनशील परिसर असल्यामुळे तेथील अधिकार्‍याची भेट घेऊन पोलिस पथक आरोपीच्या घराबाहेर दबा धरून बसलं होतं. 19 मे रोजी आरोपी दिसताच त्याला अटक करण्यात आली. 
राजौरी पोलिस स्टेशनाजवळ त्याच्या नातलगांनी जमाव गोळा करून अटकेला विरोध केला असतानाही मुंबई पोलिस आरोपीला घेऊन मुंबईत आले. आरोपीला न्यायालयात हजर केले गेले नंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती