मुकुल रोहतगी मराठा आरक्षणावर सरकारची बाजू मांडणार

सोमवार, 4 फेब्रुवारी 2019 (09:26 IST)
ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. हरीश साळवे यांना फेब्रुवारी-मार्चदरम्यान जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या सुनावण्या असल्यामुळे, देशाचे माजी अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर शासनाची बाजू मांडणार आहेत. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, रोहतगी यांनी नवी दिल्ली येथे याप्रकरणी शासनाकडील सर्व माहिती जाणून घेतली आहे.
 
 महाधिवक्ता अ‍ॅड. आशुतोष कुंभकोणी यांच्यासह अ‍ॅड. विजय थोरात, अ‍ॅड. साखरे असे दिग्गज वकील यापूर्वीच नियुक्त करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली विनंती रोहतगी यांनी मान्य केली आहे. त्यानुसार त्यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाने काढले आहेत. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. परमजितसिंह पटवालिया आणि सर्वोच्च न्यायालयातील सरकारी वकील अ‍ॅड. कटणेश्‍वरकर यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती