खासदार संजय राऊत यांची लीलावती रुग्णालयात आरोग्य तपासणी

सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (08:15 IST)

शिवसेना खासदार संजय राऊत यांची लीलावती रुग्णालयात आरोग्य तपासणी झाली. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर पुढील उपचारासाठी राऊत येत्या मंगळवारी लीलावती रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत शनिवारी लीलावती रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांची प्रथमिक तपासणी झाली. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर हृदयाची अँजिओप्लास्टी सर्जरी झाली होती. याच सर्जरीशी निगडीत शनिवारी त्यांच्या पुढील तपासण्या करण्यात आल्या. आता राऊत पुन्हा मंगळवारी रुग्णालयात दाखल होणार आहेत. यावेळी त्यांच्यावर पुढील उपचार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती