प्रकाश आंबेडकर यांची राज्यपाल यांच्न्या सोबत बैठक, सुचवले हे सर्व पर्याय

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसून येतो आहे. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेतली आही राज्यातील सत्ता संघर्ष आणि राजकीय स्थितीविषयी चर्चा केली. यामध्तये त्यांना काही पर्याय समोर ठेवले आहे. राज्यपालांसोबत बैठक झाल्यावर त्यांनी पत्रकारांना या चर्चेविषयी माहिती दिली.
 
यावेळी प्रकाश आंबेडकर पत्रकारांसोबत बोलतांना म्हणाले की, ज्या दिवशी शपथविधी होतो तो दिवस विधीमंडळाचा पहिला दिवस आहे असे असते. त्यामुळे आम्ही राज्यपालांशी चर्चा केली असून, मागच्या वेळी 8 नोव्हेंबर रोजी फडणवीस सरकारचा शपथविधी झाला होता. आता त्यानुसार त्यांचा कार्यकाळ उद्या 8 नोव्हेंबर संपत असून, त्यामुळे आज रात्री किमान सरकार स्थापन झालं पाहिजे. नाहीतर 4-5 निवडणून आलेल्या विधीमंडळ सदस्यांचा शपथविधी तरी घेतला पाहिजे. नंतरच सभागृह गठित झालं असं म्हणता येईन. या दोन्ही गोष्टी होणार नसतील, तर 356 कलमानुसार राष्ट्रपती शासन लागू करावे लागेल. त्याला पर्याय राहणार नाही असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती