Monsoon Update: मान्सून मुंबईत, राज्यात या ठिकाणी बरसला

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या ४८ तासांत मान्सून मध्य अरबी समुद्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये दाखल होईल. मान्सूनचा पुढील प्रवास कायम वेगाने सुरू राहण्यासाठी हवामान अनुकूल आहे. दरम्यान, राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र येथे चांगला पाऊस पडत आहे.
 
दरम्यान, मुंबई शहर, उपनगरात काही क्षण पडलेल्या पावसाने नंतर पाऊस फिरकला नाही. मुंबईकरांना उकाड्यापासून आणि उर्वरीत महाराष्ट्राला पावसाच्या प्रतिक्षेपासून काहीसा दिलासा मिळाला. परंतू मुंबईकरांना मोठ्या पावसाची अपेक्षा होती. मात्र मध्य रेल्वे मार्गावर येणाऱ्या ठाणे शहर आणि परिसरातही चांगलाच पाऊस कोसळला. 
 
अंदाजाप्रमाणे मंगळवारी आणि बुधवारी मुंबई आणि आसपासच्या प्रदेशात हवामान ढगाळ राहील. शिवाय शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. 27-28 जून रोजी मुंबई, ठाणे, पालघर येथे पावसाच्या सरी कोसळतील. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे 28 जून पर्यंत सरींची शक्यता आहे. तसेच 25 ते 28 जून दरम्यान विदर्भामध्ये तुरळक पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
 
इकडे पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. पण या आनंदासह अनेकजागी पाणी तुंबल्याच्या घटना समोर आल्या. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा पाऊस यंदा लांबल्यामुळे राज्यातील जनतेचं लक्ष केवळ मान्सूनकडे आहे. जूनचा महिना संपत आला असला तरी पावासाचे चिन्ह नसल्याने आणि वाढलेल्या तापमानामुळे सर्व हैराण आहेत.
 
तरी आता सोमवारी पावसाने दर्शन दिले आहेत. फारसा दमदार पावस नाही तरी आगमन झाल्यामुळे लोकांना आनंद झाल्याचे दिसत आहे. तसेच धुळे, नंदूरबार, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथे मंगळवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
 
तसेच इतर राज्यांबद्दल सांगायचे तर मान्सूनचा प्रवास पुढे सरकत असून मान्सून मध्य अरबी समुद्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दाखल झाला आहे.
 
तसं तर नेहमी मान्सून कोकण नंतर मुंबई दाखल होत असे पण यंदा मुंबईच्या आधी उर्वरीत महाराष्ट्रात मान्सून दाखल झालं असून अपवाद बघायला मिळाला. मराठवाड्यात देखील मान्सून पोहचला परंतू सर्वीकडे काही सरी कोसळ्या. मात्र जोरदार पावासाची प्रतिक्षा सुरु आहेच.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती