मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण देण्याचं विधेयक महाराष्ट्र विधानसभा तसंच विधान परिषदेत बिनविरोध मंजूर झालं आहे. 5 डिसेंबरपासून राज्यात मराठा आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न आहे.
 
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विधानसभेत हे विधेयक मांडल्यानंतर विरोधी पक्षांनी त्याला एकमताने पाठिंबा दिला आहे. आता राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होणार.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की आम्ही मराठा आरक्षणासाठी प्रक्रिया पूर्ण केली असून विधेयक मांडले आहे. त्यांनी धनगर आरक्षणावर रिपोर्ट पूर्ण करण्यासाठी एक उप समिती गठित केली असून लवकरच एक रिपोर्ट आणि एटीआर विधानसभेत मांडण्यात येईल.
 
सरकार 5 डिसेंबरपर्यंत राज्यात मराठा आरक्षण लागू करण्याचा प्रयत्नात आहे. 30 नोव्हेंबरला विधेयक पारित करून पाच दिवसात कायदेशीर अमलात आणता येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती