भाजपची महाजनादेश यात्रा ५ दिवस पुढे ढकलली

बुधवार, 14 ऑगस्ट 2019 (16:30 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा पूर्वनियोजित दुसरा टप्पा 5 दिवस पुढे ढकलला आहे. दुसरा टप्पा २१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान ११ दिवसांचा असणार असून तो नंदुरबार येथून सुरू होत असल्याची माहिती यात्रा प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली. महाजनादेश यात्रा दुसर्‍या टप्प्यात १४ जिल्हे, ५५ मतदारसंघात जाणार आहे. यात ३९ जाहीर सभा, तर ५० स्वागत सभा होतील. दुसर्‍या टप्प्याचा समारोप ३१ ऑगस्टला सोलापूर येथे होणार आहे. तसेच महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा गणेशोत्सव संपल्यावर होणार असल्याचे आमदार ठाकूर म्हणाले. सांगली, कोल्हापूर येथील पूरस्तिथीमुळे ३ दिवस अगोदरच पहिला टप्पा बंद झाला होता. यापूर्वी १७ तारखेपासून दुसरा टप्पा सुरू होणार होता. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती