लासलगाव जळीतकांड पीडितेचा मृत्यू

शनिवार, 22 फेब्रुवारी 2020 (10:09 IST)
सहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या लासलगाव जळीतकांडातील पीडितेचा अखेर मृत्यू झाला. मुंबईच्या मसिना रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. 
 
शुक्रवारी रात्री एक वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह अंत्य संस्कारासाठी लासलगावला नेला जाणार आहे.
 
लासलगाव येथील बस स्थानकावर 15 फेब्रुवारी झालेल्या वादानंतर ही महिला भाजली होती. याप्रकरणातील मुख्य आरोपी रामेश्वर भागवत, पेट्रोलपंप व्यवस्थापक व कर्मचारी आकाश शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
 
यातील प्रमुख आरोपी रामेश्वर भागवतला निफाड न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर, आकाश शिंदेला 15 हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. तर पेट्रोलपंप व्यवस्थापकास अद्यापही अटक केलेली नाही. अंगावर पेट्रोल टाकून काडी पेटविताना झालेल्या झटापटीत ही पीडिता भाजली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती