पुण्यातील प्लेरसिद्बध कॉन्ट्रॅक्टर विनोद जोशी यांची पत्नीसह कोल्हापुरात आत्महत्या

पुण्यातील लेबर कॉन्ट्रॅक्टर विनोद रमाकांत जोशी यांनी आपल्या पत्नी आणि मुलासह विष प्राशन करून आत्महत्या केली. मात्र, यामध्ये मुलगा बचावला असून त्याच्यावर कोल्हापूरातील सीपीआरमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. 
 
हा प्रकार व्हीनस कॉर्नर कोंडाओळ मार्गावरील पल्लवी लॉजमध्ये शुक्रवारी मध्यरात्री उघडकीस आली. व्यावसायातील नुकसानिमुळे त्यांनी हे पाऊल उचलले असल्याची शक्यता त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. विनोद रमाकांत जोशी (वय ५९), मीना जोशी (वय-५०) असे मृत्यू झालेल्यांची नाव आहेत. तर मुलगा श्रेयस जोशी (वय-१७) याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत. मृत्यूपूर्वी तिघांची सही असलेली चिठ्ठी पोलिसांना आढळून आली आहे. यामध्ये त्यांनी कोणाचाही दोष नसल्याचे लिहले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विनोद जोशी हे पुण्यातील पिरंगुट, हडपसर, कोथरूड परिसरातील प्रसिद्ध लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्याकडे पुण्यातील सात कंपन्यांचे कंत्राट होते. मात्र, मागील वर्षापासून व्यवसायातील नुकसानीमुळे जोशी कुटंबीय आर्थिक अडचणीत सापडले होते. 
 
पोलिसांना त्यांच्याजवळ चिठ्ठी सापडली असून, यामध्ये त्यांनी व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आम्ही सामुहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या आत्महत्येची बातमी आपल्या नातेवाईकांना देण्यात यावी. तसेच याबाबत कोणालाही दोषी ठरवू नये. आमची ओळखपत्रे बॅगेतील काळ्या लखोट्यात ठेवण्यात आली आहेत असे लिहून त्यांनी धन्यवाद असा उल्लेख चिठ्ठित केला आहे.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती