कोंढवा भिंत अपघात : आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनीअर, लेबर कॉन्ट्रॅक्टरचे परवाने रद्द, बिल्डर बंधूंची कोठडी वाढवली

बुधवार, 3 जुलै 2019 (10:02 IST)
कोंढवा सीमाभींत कोसळून १५ बांधकाम मजूरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बांधकाम व्यवसायिकांच्या पोलीस कोठडीत ६ जुलैपर्य़ंत वाढ करण्यात आली आहे. विवेक सुनिल अगरवाल (वय ३२) आणि विपुल सुनिल अगरवाल (वय ३० दोघे रा. क्लोव्हर हिल्स, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) अशी पोलिस कोठडी सुनावलेल्या बांधकाम व्यावसायिक बंधूंची नावे आहेत. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने दोघांनाही आज कॅम्पमधील लष्करी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. देशपांडे यांनी दिला. स्थानिक रहिवाशांनी लेखी आणि तोंडी तक्रार करूनही बिल्डरनी याकडे दुर्लक्ष केले. आरोपींनी हा गुन्हा जाणीवपूर्वक केला असून भितीचा आराखडा तयार करणाऱ्या सल्लागाराविषयी आरोपी माहिती देत नव्हता. त्यमुळे कोंढवा येथील सीमाभिंत पडल्या प्रकरणी दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलानी आज न्यायालयात केली.सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ बांधकाम मजुरांचा जीव गेला. याला कारणीभूत असलेल्या अल्कॉन लॅन्डमार्क्स या बंधकाम व्यावसायिकासह आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनीअर, लेबर कॉन्ट्रॅक्टरचे परवाने महापालिकेने रद्द केले आहेत. परवाने रद्द का करू नेयेत अशी विचारणा करणारी नोटीस संबंधितांना देण्यात आली असून त्यांना आठ दिवसात आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.पुणे महापालिकेने कांचन ग्रुपच्या रॉयल एक्झॉटीक इमारतीच्या बांधकामाला स्थगिती दिली आहे. तसेच अल्कॉन लॅन्डमार्क्स संचालक जगदीश अगरवाल, विवेक अगरवाल, आर्किटेक्ट सुनिल हिंगमिरे, स्ट्रक्चरल इंजिनिअर अकील शेख यांचे परवाने रद्द करून नवीन प्रस्ताव दाखल करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कांचन ग्रुपचे पंकज व्होरा, सुरेश शहा आणि रश्मिकांत गांधी यांचे देखील परवाने रद्द करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती