राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरण भोवणार ?

शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (09:06 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात देशव्यापी वातावरण निर्मितीसाठी पुढे आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नऊ ऑगस्टला क्रांतीदिनी होणाऱ्या ईव्हीएमविरोधी मोर्चासाठी निमंत्रण देण्यासाठी पश्चिम बंगालला देखील गेले आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन निमंत्रण देखील दिले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपविरोधात राज यांनी जो प्रचार केला होता, मात्र स्वतःचे उमेदवारच नसल्याने त्याचा फारसा परिणाम  झाला नाही. असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची डोकेदुखी होऊ शकते असे चित्र आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार राज ठाकरे सक्तवसुली संचलनालयाच्या रडारवर असून, लवकरच ईडीकडून त्यांना समन्स बजावण्याची येणार आहेत. कोहिनूर मिल क्रमांक तीनच्या व्यवहारामध्ये राज यांची महत्त्वपूर्ण भूमिका असून, व्यवहारावरून राज ईडीच्या यादीमध्ये असल्याची चर्चा आहे.
 
राज यांचा पक्षाचा मुंबई-पुणे-नाशिक मध्ये प्रभाव आहे. या पटट्यात सत्ताधारी भाजपकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर राज यांची तोफ नियंत्रित करणासाठीही प्रयत्न सूरू आहेत. दरम्यान, ईडीने कोहिनूर सीटीएनएलचे मुख्य वित्त अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला आहे. पुढील टप्पा म्हणून राज यांना समन्स बजावण्यात येणार आहे. त्यामुळे राज यांच्न्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती