सूत्र ठरलं? भाजप 32, शिवसेना 12, राष्ट्रवादी 4

बुधवार, 6 मार्च 2024 (09:30 IST)
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेत महायुतीच्या जागा वाटपावर सविस्तर चर्चा केली.
 
रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपाच्या सूत्रावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. यामध्ये महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजपला 32 जागा, शिवसेनेला (शिंदे गट) 12 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वाट्याला अवघ्या 4 जागा आलेल्या आहेत. महायुतीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे.
 
मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत निवडणूक लढवताना भाजपने 26 तर शिवसेनेने 22 जागांवर उमेदवार उभे केले होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे सध्या 18 पैकी 13 खासदार आहेत. त्यामुळे किमान शिवसेनेने जिंकलेल्या सर्व 18 जागा मिळाव्यात अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागणी होती, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 8 जागांसाठी हट्ट धरला होता. परंतु शिवसेनेला अधिकच्या जागा देण्यास नकार देत केवळ 12 जागा देण्यावर एकमत झाले. तर अजित पवार यांच्या वाट्याला सध्याच्या 4 पैकी 4 जागा दिल्या जाणार आहेत.

Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती