कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण लांबले

शनिवार, 17 फेब्रुवारी 2024 (09:39 IST)
मुंबईतील पहिल्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार होते. तर संपूर्ण काम मे महिन्यात पूर्ण होणार असून त्यानंतर त्याचे पूर्णपणे लोकार्पण करण्याचे नियोजन होते; मात्र काही कारणास्तव लोकार्पण करण्याचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला आहे.
 
मुंबईत वाढती लोकसंख्या व वाढती वाहन संख्या पाहता मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतच्या 10.58 किमी लांबीच्या कोस्टल रोडचे काम हाती घेतले. त्यासाठी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन व लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांना दोन टप्प्यात कामे विभागून देण्यात आली. या कोस्टल रोड च्या कंत्राट कामाची मूळ किंमत 12 हजार 721 कोटी रुपये होती. मात्र कामात काही बदल झाल्याने काम वाढले, खर्च वाढला आणि कामाची मुदतही वाढली. त्यामुळे प्रकल्प खर्च थेट 14 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र या कोस्टल रोडच्या कामामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर व जलद होणार आहे.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती