गोंदिया जिल्ह्यात तापमानात मोठी घट, गारवा वाढला

शनिवार, 16 जानेवारी 2021 (09:04 IST)
राज्यात गोंदिया जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली असून गोंदिया जिल्ह्यात 6.8 डिग्री कमी तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा हा विदर्भात सर्वात थंड जिल्हा ठरला आहे. मागील तीन दिवसापासून तापमानात हळू हळू घट झाल्याने काळाच्या मध्यरात्रीपासून गोंदिया जिल्हा गारवा वाढला आहे. एका दिवसात 2.7 अंश सेल्शिअसने कमी झालं आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या वातावरणामध्ये मोठया प्रमाणात गारवा जाणवत आहे. पुढे दोन ते तीन दिवस अशीच थंडी कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. 
 
एककीडे विदर्भात गारवा जाणवत असला तरी मुंबईत पारा वाढत चालला आहे. आयएमडीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या मते, उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात घट होते आणि हवेत रागवा जाणवतो. पण, यावर्षी हवेचं पॅटर्नमध्ये बदल झाला आहे. तेलंगणा आणि तामिळनाडूतील उष्ण हवेमुळे तापमानात वाढ होत आहे. तर येत्या दोन दिवसात रात्रीच्या वेळी तापमानात घट होऊन थंडी पडेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती