मंदिरे खुली करण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे साकडे

सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (15:40 IST)
राज्यातील मंदिरे उघडण्यात यावी यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्र्यंबकेश्वरमधील १० पुजाऱ्यांचं शिष्टमंडळ ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालं होतं. यावेळी पुजाऱ्यांनी मंदिरे खुली करण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे साकडं घातलं.
 
आम्ही सर्व नियमांचे आणि सूचनांचे पालन करु. राज्यातील मंदिरे खुली करावीत आणि आम्हाला मंदिरात जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या पुजाऱ्यांनी केली आहे. यावेळी राज ठाकरेंनी मॉल उघडले मंदिरे का नाही? असा सवाल केला. मंदिरे खुली केली जावीत असे आपलेही मत आहे आहे पण इतर धर्मीयांचे काय? ते सर्व नियम पाळतील का अशी शंका राज ठाकरेंनी उपस्थित केली. जर सगळी मंदिरे उघडली आणि झुंबड उडाली तर ते सगळं नियंत्रित कसे करणार, अशी प्रश्न वजा चिंता राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती