घरच्या अभ्यासाला कायमची सुट्टी

सोमवार, 11 मार्च 2024 (12:07 IST)
आता घरच्या अभ्यासाला म्हणजे राज्यातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या गृहपाठाला कायमची सुट्टी होण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी गृहपाठा बाबत आपले मत व्यक्त केलं आहे. दोन वर्षांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. या बाबतीत शिक्षण तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असे सांगितले होते. मात्र या बाबत अद्याप निर्णय झाला नाही. 

लोणावळा येथे एका शिक्षक संमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल बैस म्हणाले. जगातील अनेक राष्ट्रात मुलांना गृहपाठ दिले जात नाही. आपण देखील हे धोरण अवलंबवायला हवं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून शाळेतच अभ्यास करून घ्यावा.क्षेत्र भेट, उद्यान भेट, गडकिल्ले , नदी, वारसा स्थळ असे काही उपक्रम राबवून मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिले पाहिजे. मुलाना मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट पासून दूर करण्याची गरज आहे. त्यासाठी पालकांना प्रयत्न करावे लागतील. 

मुलांचा विकास समूहामध्ये होतो. त्यांच्यात एकत्रित पणामुळे पुढे जाण्याची भावना निर्माण होते. खेळामुळे त्यांच्यात विजय आणि पराभवाची भावना निर्माण होते. शिक्षकांनी आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे देशाच्या आत्मनिर्भरते साठी विद्यार्थ्यांनी सक्षम होण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आवश्यक कौशल संपादन करावे या साठी  शैक्षणिक प्रक्रियेत बदल करावे लागतील .या साठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा असे राज्यपाल म्हणाले. 
 
 Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती