पुण्यात दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती लागू

वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच आजपासून पुण्यात दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे हेल्मेट सक्तीला हेल्मेट विरोधी कृती समितीकडून विरोध करण्यात आला आहे. 
 
पुण्यातील वाहतूक समस्या तसेच गंभीर स्वरुपाच्या अपघातांची वाढती संख्या विचारात घेऊन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी नोव्हेंबर महिन्यात शहरात हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला होता. हेल्मेट वापरल्यास गंभीर स्वरुपाच्या अपघातातील जीवितहानीचे प्रमाण कमी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. १ जानेवारीपासून या नियमाची अंमलबजावणी होईल, असे त्यांनी म्हटले होते.  यानुसार आजपासून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे.
 
‘हेल्मेट परिधान केल्याने गंभीर स्वरुपाची दुखापत टाळता येते. आगामी वर्षांत रस्ते अपघात कमी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार असून दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करावे’, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती