फास्टॅगसाठी जाहीर केलेल्या ५ टक्के कॅशबॅकला उत्तम प्रतिसाद

मंगळवार, 19 जानेवारी 2021 (21:38 IST)
पथकर नाक्यावरुन कॅशलेस व वेगवान प्रवासासाठी फास्टॅगधारक कार, जीप आणि एसयुव्ही वाहनधारकांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने जाहीर केलेल्या ५ टक्के कॅशबॅकला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. केवळ सात दिवसात ३ लाख ४५ हजार १५५ वाहनधारकांनी कॅशबॅकचा लाभ घेतला आहे. पथकर नाक्यांवर फास्टॅग प्रणालीच्या १०० टक्के अंमलबजावणीसाठी महामंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
 
त्याअंतर्गत यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) पथकर नाक्यावर फास्टॅगधारक कार, जीप व एसयुव्ही वाहनांना प्रत्येक फेरीला ११ जानेवारी २०२१ पासून ५ टक्के कॅशबॅक महामंडळाने लागू केली. त्याचा योग्य परिणाम दिसून आला आहे. ११ ते १७ जानेवारी २०२१  या कालावधीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व वांद्रे-वरळी सागरी सेतू पथकर नाक्यावर एकूण ३ लाख ४५ हजार १५५ वाहनधारकांनी कॅशबॅकचा लाभ घेतला.
 
या कॅशबॅकच्या मोबदल्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एकूण रुपये १९ लाख ०८ हजार ५९७ रूपये रकमेचा परतावा वाहनचालकांच्या फास्टॅग खात्यामध्ये जमा केला आहे. ‘महामंडळाच्या कॅशबॅकला अपेक्षेहून अधिक प्रतिसाद मिळाला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती