मुंबईतील अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी अनुदानासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

शनिवार, 16 नोव्हेंबर 2019 (17:32 IST)
अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी अल्पसंख्याक विकास विभागाच्या अनुदान योजनेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी केले आहे. या योजनेसाठी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाने मुंबई जिल्हा कार्यक्षेत्रातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांकडून प्रस्ताव मागविले आहेत. हे प्रस्ताव २०१९-२० या आर्थिक वर्षाकरिता मागविण्यात आले आहेत.
 
७ ऑक्टोबर, २०१५ रोजी अल्पसंख्याक विकास विभागाच्या संकेतस्थळावरील उपलब्ध विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१ यांच्याकडे पाठवावेत. पात्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी प्रस्ताव पाठवण्यासाठीची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर,२०१९ आहे.योजनेसंदर्भातील अधिक तपशील अथवा विहित अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती