सरकारी कर्मचाऱ्याना दुपारी १ ते २ जेवणाची सुट्टी, कामचुकारपणा करणार्‍यांना आदेशाने चाप बसणार

शनिवार, 8 जून 2019 (16:23 IST)
राज्यातील सरकारी अधिकारी, कर्मचार्‍यांना मंत्रालयाच्या धर्तीवर रोज दुपारी एक ते दोन वेळेत अर्धा तास जेवणाची सुट्टी देण्यात आली असून, दुपारी ते एक ते दोन या वेळेत कधीही अर्धा तासाची सुट्टी जेवणांसाठी घेऊ शकणार आहेत. तर नंतर या अधिकार्‍यांना आपल्या जागेवर बसून कामे करणे बंधनकारक करणारा आदेश सरकारने काढला आहे. त्यामुळे जेवणाच्या सुट्टीच्या नावावर कामचुकारपणा करणार्‍यांना या आदेशाने चाप बसणार आहे. 
 
मंत्रालयीन अधिकारी व कर्मचार्‍यांना दुपारी एक ते दोन या वेळेत जेवणासाठी अर्धातास सुट्टी देण्यात आली असून, त्याबाबतचा आदेश यापूर्वीच काढण्यात आला आहे. मात्र, राज्यातील विविध सरकारी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचार्‍यांना जेवणाच्या सुट्टीबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे जेवणाच्या नावाखाली अधिकारी व कर्मचारी जागेवर थांबत नव्हते ते काम चुकवत होते. कर्मचारी जागेवर नसल्याने त्यांच्याकडे कामे घेऊन येणार्‍यांना नागरिकांना त्यांच्या कामासाठी फार वेळ  तिष्ठत बसावे लागत होते. अनेकवेळा त्यांना हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने नवीन आदेश जारी केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती