गो एअर मधील घटना, म्हणून त्याने केली आत्महत्या

नागपूरमध्ये गो एअर या खाजगी विमान कंपनीत काम करणाऱ्या मंथन चव्हाण (१९) तरुणाने आत्महत्या केली आहे. कंपनीतील अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.
 
नागपूरच्या चंद्रमणी नगर येथे राहणारा मंथन अभ्यासात हुशार होता. १२ वीचे शिक्षण घेतल्यावर त्याने एविएशन अभ्यासक्रम निवडला. नागपुरात २ वर्षांचा एविएशनचा अभ्यासक्रम सुरु असतानाच 'गो एअर' या हवाई कंपनीत तो ग्राउंड स्टाफ पदावर ९ महिन्यापूर्वी रुजू झाला. १५ दिवसांपासून मंथन आजारी होता. त्यामुळे तो सुट्टीवर घरीच होता. त्याला कावीळ झाल्याचे निदान झाले त्यामुळे त्याला आणखी काही दिवस सुट्टीची आवश्यकता होती.
 
मात्र कंपनीतील अधिकारी आजारी असूनही त्याला कामावर हजार राहण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप मृत मंथनच्या कुटुंबीयांनी केला आहे. कामावर रुजू हो नाही तर नोकरी सोडावी लागेल या तणावातून  मंथनने आत्महत्या केल्याचा आरोप मंथनच्या कुटुंबीयांनी केला आहे. मृत मंथनची आई पोलीस दलात कार्यरत आहे तर वडील एक्स रे तंत्रज्ञ असून त्याला एक १२ वर्षाचा लहान भाऊ आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती