पैशाचा पाऊस पाडतो, शारिरीक सबंध ठेवायला महिलेवर दबाव

नाशिक येथील निफाड परिसरात पुनः अंधश्रद्धा वाढवणारी संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी आगोदर  पैशाचा पाडून नंतर त्यामधील हिस्सा महिलेला देऊन तसेच तिचे शुद्धीकरण व पुजा करून शारिरीक संबंध ठेवण्यास तयार करण्यास भाग पाडल्याची घटना  घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात हा प्रकार घडला. 
 
पोलिसांनी या प्रकरणी निफाड तालुक्यातील दोघांसह नाशिकमधील एकास ताब्यात घेतले असून यामध्ये योगेश नागरे (शिवरे ता. निफाड )  योगेश सोनार (पवननगर, सिडको नाशिक) प्रसाद जाधव (टाकळीविंचुर ता. निफाड ) या तिघांना सोमवारी पहाटे पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष अनिष्ट व जादुटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ कलम ३ भादवि ३४ अन्वये गुन्हा त्या संशयितांविरोधात नोंदविण्यात आला. निफाडचे पोलिस उप अधीक्षक माधव पडिले, पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि जे. आर. सातव अधिक तपास करत आहेत. कोणताही पैशाचा पाऊस पडत नसून कोणतेही चमत्कार होत नाही असे सामाजिक कार्यकर्ते यांनी म्हटले आहे 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती