बोलेरो दुचाकीची धडक होऊन अपघातात पाच जण जागीच ठार

शनिवार, 6 एप्रिल 2024 (11:19 IST)
नाशिक : दिंडोरी रोडवर ढकांबे गावाजवळ आज दुपारी बोलेरो गाडीचे टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाल्याचे समजते.
मिळालेली अधिक माहिती अशी, की वणी येथे दर्शन घेऊन बोलेरो गाडीतून काही जण नाशिककडे येत होते. बोलेरो भरधाव वेगात असल्याने चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले. तेव्हाच गाडीचे टायर फुटल्याने गाडी दुचाकीवर जाऊन आदळली.या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला दुचाकीवरील दोघे तर कार मधील तिघे जागीच ठार झाले. तर तिघे जखमी झाले. 
 
जखमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. तसेच, घटनास्थळी दिंडोरी पोलीस दाखल झाले आहेत.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविले आहे. या अपघातात बोलेरो आणि दुचाकींचा चक्काचूर झाला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. 

 Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती