मुंबईत MTNL च्या इमारतीला आग, 100 जण अडकल्याची शक्यता

मुंबई - वांद्रे येथील एस व्ही रोडवरील एमटीएनएल इमारतीला आग लागल्यामुळे गोंधळ उडाला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
 
ही घटना दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली असून अग्निशमन दलाच्या जवानांचे आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहे. यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु असून एमटीएनएल इमारतीच्या गच्चीवर जवळपास 100 लोक अडकल्याची शक्यता वर्तवती जात आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
 
आगीमुळे धूर उठताना दिसत असून येथे गच्चीवर अडकलेले लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही इमारत 9 मजली असून इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. 
 
धूर इमारतीच्या नवव्या मजल्यापर्यंत पसरला असून कर्मचारी जीव वाचविण्यासाठी गच्चीवर पोहचले. त्यामुळे जवळपास इमारतीच्या गच्चीवर 100 जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन दलाचे जवान त्यांना सुखरूप बाहेर काढत आहेत. सुदैवाने अद्याप कोणीही जखमी नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती