कोरोनामुळे नव्हे तर शेतकर्‍यांनी कर्जबाजरीपणामुळे केल्या आत्महत्या

शनिवार, 11 जुलै 2020 (09:19 IST)
राज्यात बांधावर, शेतात, राहत्या घरात शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. मार्च ते जूनअखेरपर्यंत चार महिन्यात विदर्भ आणि मराठवाडयात ७८० तर उर्वरीत महाराष्ट्रात १०८० अशा एकूण १८६० शेतकर्‍यांनी कर्जबाजरीपणामुळे आत्महत्या केल्या आहेत.
 
राज्यात आतापर्यंत ९,८९३ कोरोना मृत्यू झाले असून ८,७९५ मृत्यू हे मुंबई महानगर प्रदेश, पुणे आणि इतर शहरी भागातील आहेत. त्यामुळे उर्वरित ११०० कोरोना मृत्यू हे राज्यातील ग्रामीण भागात झालेले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या या ग्रामीण भागातील कोरोना मृत्यूपेक्षा ६० टक्क्यांहून अधिक  आहे. कर्जबाजारी शेतकर्‍यांना राज्य सरकारकडून पीक कर्ज मिळवून देण्यासह इतर आर्थिक मदत तातडीने करण्याची गरज आहे. सरकारची सर्व यंत्रणा ही कोरोनामुक्तीसाठी काम करीत असून नुकतेच राज्य सरकारने ८२०० कोटी उर्वरित कर्जमाफी बँकांना दिली आहे.वेळेत पीककर्ज न मिळाल्याने आणि कर्जबाजारीपणामुळे मागील चार महिन्यांत १८६० शेतकर्‍यांनीं आपले जीवन संपविले. म्हणूनच आज राज्यातील ग्रामीण भागात कोरोना मृत्यूंपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती