'एल्गार परिषद चालते, शिवजयंतीला विरोध का?'

शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (21:25 IST)
महाराष्ट्रात सातत्याने हिंदूंचा अपमान होत आहे. तुम्ही एल्गार परिषदेला परवानगी देता, रेल्वे-बसमधील गर्दी चालते, शेतकरी मोर्चाला परवानगी देता. मात्र शिवजयंतीला परवानगी नाही? हा तुघलकी निर्णय मागे घ्या, अशी मागणी भाजप प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी केली आहे.
 
सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, शिवजयंती कार्यक्रमात 10 पेक्षा अधिक व्यक्तींनी सहभागी होऊ नये, परवानगीपेक्षा जास्त व्यक्ती सहभागी झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असं सांगितलं आहे. शिवसेना सरकारने हे फर्मान मागं घ्यावं, असं राम कदम म्हणाले.
 
ज्यांच्या नावाने पक्ष चालवला आणि राज्यात सत्ता स्थापन केली, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला शिवसेनेकडून विरोध केला जात आहे, हे कुठले तुमचे तुघलकी निर्णय? आम्ही राज्यात थाटामाटात शिवजयंती साजरी करू, तुमचा निर्णय मागे घ्या, अशी टीका घणाघात राम कदम यांनी राज्य सरकारवर केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती