इंजिनीअरिंगमध्ये मराठी सक्ती करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय

रविवार, 28 जानेवारी 2024 (16:53 IST)
महाराष्ट्रात मराठीत पाट्या लावण्याच्या सक्ती नंतर आता इयत्ता पहिली ते दहावीत मराठी माध्यमाची सक्ती करण्यात आली असून आता उच्च आणि तंत्रशिक्षण विभागात म्हणजे इंजियरिंग मध्ये देखील मराठीत शिक्षण घेण्याची सक्तीचा आदेश देण्यात आला असून शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वाशीत सुरु असलेल्या विश्व मराठी संमेलन 2024 मध्ये केली. या संमेलनात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली होती.  
 
या कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज ठाकरे यांची स्तुती केली. ते म्हणाले राज साहेबानी बाळा साहेब ठाकरे यांचा वारसा जपला आहे.राज साहेबांचे भाषण व त्यांचे वक्तृत्व हे सर्वांसाठी आकर्षण आहे. या संमेलनासाठी आम्ही त्यांना बोलावलं
 
या वेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी मराठी विषयावर अनेक वर्षांपासून काम करत आहे. माझ्यावर मराठीचे संस्कार झाले आहे.मी या विषयावर आंदोलन केले, केस घेतले, तुरुंगात गेलो. महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद होत आहे. मला जून महिन्यात अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळांनी निमंत्रण दिले आहे.

तिथले महाराष्ट्र मंडळ मराठी शाळा उघडणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या महाराष्ट्रात मराठी व्यतिरिक्त इतर भाषा कानावर पडल्यावर खूप त्रास होतो. माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही. मात्र हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. इतर भाषांसारखी ही एक भाषाच आहे. या देशात राष्ट्रभाषा म्हणून कोणतीही भाषा निवडलेली नाही. इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी पर्यंत मराठी भाषा सक्ती केल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले यावर राज ठाकरे यांनी या साठी चांगले शिक्षक नेमण्याचा सल्ला देखील केसरकरांना दिला. 
 
Edited By- Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती