दिवाळीसाठी एसटीकडून तिकीट दरात १० ते २० टक्के हंगामी भाडेवाढ

सोमवार, 18 सप्टेंबर 2017 (09:58 IST)

दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने तिकीट दरात १० ते २० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. साधी, निमआराम, एशियाड, शिवनेरी अशा सर्व बस प्रवासात ही भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. हंगामानुसार भाडेवाढ करण्याचे विशेषाधिकार एसटी महामंडळाला आहेत. या अधिकारानुसार ही भाडेवाढ करण्यात आली आहे.

सणांच्या काळात प्रवास करणाऱ्याची संख्या लक्षणीय असते. या कालावधीचा फायदा घेण्यासाठी एसटी महामंडळाने सर्व प्रवासी गाड्यांमध्ये भाडेवाढ लागू केली आहे. १४ ते ३१ आॅक्टोबर दरम्यान ही भाडेवाढ करण्यात येणार आहे. १ नोव्हेंबरपासून जुन्या दराप्रमाणे तिकीट आकारले जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वतीने देण्यात आली. साध्या एसटीने प्रवास करणाºया प्रवाशांना १० टक्के, निमआराम बसने प्रवास करणाऱ्याना १५ आणि वातानुकूलित सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना २० टक्के भाडेवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती