काळजी करू नका सर्व ठीक होणार आहे - नाना पाटेकर

बुधवार, 14 ऑगस्ट 2019 (16:19 IST)
तुम्ही कोणतीही काळजी करु नका, सर्व काही नीट होणार आहे असं आश्वासन अभिनेते नाना पाटेकर यांनी पूरग्रस्तांना दिले आहे. नाना पाटेकर यांनी आज कोल्हापुरातल्या शिरोळमध्ये भेट दिली आहे. शिरोळमध्ये ५०० घरं बांधणार असल्याचं नाना पाटेकर यांनी सांगितले आहे. या कामासाठी शासनाने काही निधी दिला असून, बाकीचे पैसे आम्ही देतो आहे. मला यासाठी कोणतंही श्रेय नको जे काही करतोय ते आपण सगळे करतो आहोत असंही नाना पाटेकर यांनी यावेळी सांगितले आहे. नाना पाटेकर यांनी आज पद्माराजे विद्यालयात पूरग्रस्तांची भेट घेतली. काळजी करु नका आपण सगळे सोबत आहोत सगळं काही नीट होणार असं आश्वासन नाना पाटेकर यांनी पूरग्रस्तांना दिले आहे. आम्ही शिरोळमध्ये आलो आहे इथे आता ५०० घरं उभारणार आहोत. नाम, नाना पाटेकर, मकरंद असं आम्हाला श्रेय लाटायचं नाही. प्रत्येकाने आपला वाटा उचलायाचा आहे, नाना पाटेकर यांनी म्हटले आहे. आपण सर्वानी सोबत असून आम्ही पूर्ण मदत करणार आहोत असे नाना यांनी स्पष्ट केले.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती