उपसमिती आता स्थापन करणार तर पाच दिवसांत मराठा आरक्षण कसे देणार? - धनंजय मुंढे

शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018 (17:03 IST)
विधिमंडळात सध्या मराठा आरक्षण विषय जोरदार सुरु असून, विरोधक सरकारला प्रश्न विचारत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस ने त्यांची भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा शासन आदेश गुरूवारी शासनाने काढला. आता सलग तीन शासकीय सुट्ट्या आहेत आणि अधिवेशनाचे आता केवळ 5 दिवस शिल्लक आहेत. या ५ दिवसात ही समिती तज्ज्ञांना, विधिज्ञांना केव्हा आमंत्रित करणार? अभ्यास करून सर्व वैधानिक कार्यवाही कधी पूर्ण करणार ? आणि कायदा करून दि. १ डिसेंबरच्या आत आरक्षणाचा निर्णय केव्हा घेणार ? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. मुख्यमंत्र्यांची दि. १ डिसेंबरला जल्लोष करण्याची घोषणा त्यामुळे फसवणुकच ठरेल की काय ? अशी भीती मुंडे यांनी व्यक्त केली आहे. सरकारची यातून अनास्थाच दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती