अभिनेत्री दिपाली सय्यद उपोषणाला बसणार मात्र कारण काय

बुधवार, 10 जुलै 2019 (16:36 IST)
मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद या लवकरच उपोषण करणार आहे. त्यांनी भाजपा खासदार सुजय विखे यांना काही प्रश्न देखील विचारले आहेत. मुख्यमंत्री व खासदार सुजय विखे हे साकळाई बाबत काहीच बोलत नसून, मात्योर ही योजना होईपर्यंत मी शांत बसणार नाही. त्यासाठीच येत्या क्रांती दिनापासुन मी उपोषणास बसणार आहे अशी माहिती अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी दिली. अहमदनगर, श्रीगोंदे या तालुक्यातील 335 गावांसाठी वरदान मानल्या जात असलेल्या साकळाई पाणी योजनेला पर्यायी योजना देऊन संबंधित गावांना हक्काचे पाणी मिळवून देऊ शकते,' असा दावा अभिनेत्री व शिवसंग्राम पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष दीपाली सय्यद यांनी केला. येत्या 9 ऑगस्टला उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय कायम आहे त्या आगोदर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. आम आदमी पक्षासाठी 2014 मध्ये लोकसभेची नगर मतदारसंघाची निवडणूक लढवून दीपाली चर्चेत आल्या होत्या. आता त्या श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे त्यांनी श्रीगोंदे व नगर तालुक्यातील 35 गावासाठी लाभदायी ठरणाऱ्या साकळाई पाणी योजनेचा प्रश्न त्यांनी हाती घेतला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती